Share

“केंद्रीय तपास यंत्रणा पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम…” ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली:  तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना नोटीस बजावली असून दिल्लीमधील ईडीच्या मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावरच आता ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

“केंद्रीय तपास यंत्रणा या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे काम करत आहेत. केंद्र सरकारच्या इच्छेनुसार या तपास यंत्रणा विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत आहेत. सीबीआय आणि ईडीसारख्या तपास यंत्रणांचा निर्लज्जपणे वापर सुरू असून केंद्र सरकार या यंत्रणांना जे काही सांगते ते या यंत्रणा करत आहेत. त्यांच्याकडून फक्त विरोधी पक्षांवरच कारवाई होत आहे. विरोधकांना दाबण्यासाठी या तपास यंत्रणांचा वापर होऊ शकत नाही.”, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

दरम्यान अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना कोळसा तस्करी प्रकरणात ईडीने नोटीस पाठवली आहे. यावरून सध्या केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथील नेत्यांवरच कारवाई करत असल्याचा आरोप अनेकदा केला आहे. आता ते यावरही काही प्रतिक्रिया देतील का, अशा चर्चा आता रंगत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!