मुंबई: आयपीएलची सुरुवात २६ मार्चपासून होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यंदाचे हंगाम खूप खास असणार आहे कारण. यंदा आयपीएलमध्ये १० संघ खेळणार आहेत. मात्र सोबतच यावर्षी असे काही खेळाडू आहेत जे २००८ पासून दर वर्षी स्पर्धेचा भाग होते , मात्र आता पहिल्यांदा ते स्पर्धेत खेळणार नाहीत.
यात सर्वात पाहिले नाव येते आरसीबीच्या एबी डिव्हिलियर्स (ab devillliers) याचे. त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळाच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर १८४ सामन्यांमध्ये त्याने ५१६२ धावा केल्या. ज्यात तीन शतके आणि ४० अर्धशतके झळकावली. या यादीत दुसरे नाव येते आयपीएलमधील सर्वात वरिष्ठ खेळाडू असलेल्या अमित मिश्राचे. अनुभवी लेग-स्पिनर अमित मिश्राने (amit mishra) १५४ सामन्यांत १६६ बळी घेतले आहेत. आयपीएलच्या इतिहासात मिश्रापेक्षा फक्त लसिथ मलिंगा (१७०) आणि ड्वेन ब्रावो (१६७) यांनी जास्त विकेट घेतल्या आहेत. तो यावर्षी अनसोल्ड राहिल्यामुळे खेळणार नाहीये.
या यादीत तिसरे आणि शेवटचे नाव पियुष (piyush chawla) चावला याचे आहे. तो आघाडीच्या विकेट घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने १६५ सामन्यांमध्ये १५७ बळी घेतले आहेत. पियुष २००८ ते २०१३ पर्यंत पंजाब किंग्जचा भाग होता, परंतु त्यानंतर त्याने २०१४ ते २०१९ पर्यंत किंग खानच्या टीम कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले.२०१४ मध्ये केकेआरने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले तेव्हा चावलाने विजयी धावा केल्या. २०२० मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मागच्या वर्षी तो मुंबई संघात होता. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड राहिला.
महत्वाच्या बातम्या
- “आता देश बदलत आहेत…” The Kashmir Files वर विवेक अग्नीहोत्रीची प्रतिक्रिया
- महिला शेतकऱ्यांच्या आर्थिक अनुदानात होणार वाढ!
- “काश्मीर फाईल्समधील कागद फडफडून दाखवू नका”; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- IPL 2022: फिटनेस टेस्टचा रिझल्ट आला; हार्दिक पास तर शॉमुळे दिल्लीला लागणार धक्का?!
- 50 हजार रुपये “या” शेतकऱ्यांना मिळणार; अर्थमंत्री अजित पवारांचा खुलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

