Share

ऑक्सीजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत : पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

कराड : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडाही भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जी गंभीर परिस्थिती निर्माण झालीये त्यास केंद्र सरकारचं जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत असल्याचे ऑक्टोबरमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सांगितले. पण प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना ‘भारताने कोरोनाला कसे हरवले’ असे सांगत स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत. आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!