Share

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस द्यावेत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. सध्या देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार झाली आहे. या मोहिमेला नागरिकांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा ठराव मांडला आहे.

महाराष्ट्राची महिन्यापोटी ३ कोटी डोस देण्याची तयारी आहे. त्यामुळेच विधानसभेत संमत झालेला हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू असेही टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यूदर असणाऱ्या राज्यात लवकरात लवकर हर्ड इम्युनिटी तयार व्हावी हाच ठरावाचा उद्देश असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्याची दैनिक लसीकरणाची क्षमता ही 10 ते 15 लाखाच्या दरम्यान असल्याने केंद्र शासनाने प्रत्येक महिन्यास किमान 3 कोटी लसीचे डोस राज्यास उपलब्ध करून दिल्यास राज्याचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करता येईल. यासंदर्भात राज्यातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतची मागणी आहे. देशाच्या पातळीवर महाराष्ट्रात सर्वाधिक असे तीन कोटी ४३ लाख लसीकरण झाले आहे.

एकुण ५ वर्षांच्या पुढच्या मुलांना लसीकरणाचे उदिष्ट हे आहे. त्यासाठीच ३ कोटी प्रति महिना लस उपलब्ध झाल्यास दोन महिन्यात सामुहिक प्रतिकारशक्ती तयार करू शकतो. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तसेच सर्व व्यवहार पूर्वस्थितीत होण्यासाठी तसेच लोकल सुरू करण्यासाठीचीही मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!