Share

‘एसटीच्या भाडेवाढीला केंद्र सरकार जबाबदार’

Published On: 

🕒 1 min read

अकोला : इंधन दरवाढ, महागाई मुळे एसटीच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. एसटी महामंडळाने तीन वर्षांनंतर प्रथमच भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांसाठी आहे. दरम्यान, राज्यातील एसटीच्या भाडेवाढीला सर्वार्थाने केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे डिझेलने शंभरी गाठली याचा फटका ‘एसटी’ला बसला, त्यामुळे एसटीच्या भाववाढीला केंद्र सरकार जबाबदार आहे,’ असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी केला.

एसटीच्या भाडेवाढीचा निर्णय सरकारला केंद्रातील सरकारने वाढवलेल्या डिझेलच्या किंमतीमुळे घ्यावा लागला. एसटीची आर्थिक स्थिती, कर्मचाऱ्यांची त्यातून होणारी ओढताण याचा विचार करून सरकारला नाखुशीने हा निर्णय घ्यावा लागला. सरकारचा हा निर्णय एसटीसह त्यावर अवलंबून कर्मचाऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने घ्यावा लागला. एसटीची परिस्थिती आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची होत असलेली ससेहोलपट याला महामंडळातील मान्यता प्राप्त संघटना जबाबदार आहे, असे ते म्हणाले.

स्वतः च्या स्वार्थासाठी एसटीला वेठीस धरणाऱ्या संघटनेमुळेच एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब या परिस्थितीतून एसटीला बाहेर काढत एसटीला परत गतवैभव मिळवून देण्यासाठी भगीरथ प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे गरिबांची ही एसटी वाचवण्यासाठी ही भाडेवाढ करणं याशिवाय तरणोपाय नव्हता. त्यामुळे एसटी आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ही भाडेवाढ आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता या भाववाढीचे स्वागत करेल, असा आशावाद विजय मालोकार यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!