नवी दिल्ली : देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. जवळपास महिनाभर कडाक्यातील थंडीत दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील भेट घेतली होती. त्या शिष्टमंडळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या नेत्यांचा समावेश होता.
यानंतरही अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महिना झाला असून शरद पवार हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. त्यांनी केंद्र सरकारला ३० डिसेंबर म्हणजेच उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर, ‘राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही’, असे खडेबोल शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिलाने उडवली कंगनाची खिल्ली
- ‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
- काँग्रेस-शिवसेनेतील धुसफूस शमणार? महाविकास आघाडीतील समन्वय समितीची महत्वाची बैठक
- ग्रामपंचायत : इच्छूकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी धनंजय मुंडेंचा पुढाकार
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

