नवी दिल्ली : टी20 वर्ल्ड कपचा जोश अजून कमी झाला नाही तोवर टी20 वर्ल्ड कप 2022 ची तयारी सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप 2022 चे वेळापत्रक आत नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. टी20 वर्ल्ड कप 2022 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर 13 नोव्हेंबरला फायनल मॅच मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 45 सामने होणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या 7 मैदानांवर आयोजित केलं जाणार आहेत. अॅडलेडचं ओव्हल मैदान, गॅबा, कार्डिनिया पार्क, होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल, पर्थ, मेलबर्नचं एमसीजी आणि सिडनी या स्टेडियममध्ये 45 सामने आयोजित केले जाणार आहेत.
2020 मध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार होता. मात्र कोरोना परिस्थितीतमुले ते पुढे ढकलावे लागले. दरम्यान, 2022 च्या T20 वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक जानेवारी 2022 मध्ये जाहीर केले जाणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि उपविजेते न्यूझीलंड संघाने यंदाचा टी२० वर्ल्ड कप जिंकून 2022 स्पर्धेच्या सुपर-१२ टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळवला आहे. T20 क्रमवारीतील पुढील 6 शीर्ष संघ – इंग्लंड, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश – यांनी देखील 2022 च्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यात स्थान मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’


