नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पण केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये कमतरता असल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या दिवसाला ५७ हजारांवर गेलीय. ही रुग्णसंख्या खूप मोठी आणि चिंताजनक आहे. महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांचे प्रमाण हळूहळू वाढत असले तरी ते पुरेसे नसल्याचे भूषण यांनी सांगितले.
देशात कोरोना रुग्ण ठिक होण्याची प्रमाण ८९.५१ टक्क्यांवर पोहोचले. ९.२४ टक्के नव्या रुग्णांची वाढ होत आहे. तर मृतांचे प्रमाण १.२५ टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाच्या या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. यावरून राजेश भूषण यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबाबत पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलीय.
Rise in daily new cases continues. The trend is going upward. As we engage with you today, 53 central teams are camping in 53 districts which are showing a surge in #COVID19 cases, to help the district and state administrations in tackling the pandemic: Secretary, @MoHFW_INDIA pic.twitter.com/51ONOKInvM
— PIB in Maharashtra ???????? (@PIBMumbai) April 13, 2021
याआधी राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना एक पत्र पाठवलं होतं. त्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यास ठाकरे सरकार कमी पडले. तसेच प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक त्रुटी असल्याचेभूषण यांनी म्हटले होते. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत भूषण यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- ‘मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे, त्यानंतर ते लॉकडाऊनचा निर्णय घोषित करतील’
- …म्हणून आशिष शेलार यांनी मानले वर्षा गायकवाड यांचे आभार
- महाविकास आघाडीच्या ‘त्या’ निर्णयाचं चित्रा वाघ यांनी केलं स्वागत !
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल


