नवी दिल्ली : देशातील अनेक शहरांमध्ये ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडचा तुटवडा जाणवत असून या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. कोरोना संकट हाताळतांना केंद्र सरकारच्या तयारीवरही काँग्रेस सातत्याने आक्षेप नोंदवित आली आहे.
कोरोना महामारीची दुसरी लाट गंभीर होत असताना देशात अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी किंवा आयसीयू बेड न मिळाल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना समोर येत आहेत. या मुद्यावरून राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. यासंदर्भात ट्विटरवरून आरोप करतांना राहुल यांनी या गंभीर समस्येला केंद्र सरकार दोषी असल्याचे म्हटले आहे.
देशात कोरोना महामारी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या तयारीवर आक्षेप घेत काँग्रेस गत काही दिवसांपासून आक्रमक झाली आहे. ऑक्सिजनसोबतच लसीच्या तुटवड्यावरुनही यापूर्वी राहुल गांधींनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. तर ऑक्सिजन तुटवडा संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले. त्यापूर्वी मनमोहन सिंग यांनीही पत्राद्वारे केंद्र सरकारला कोरोना संकटाविरोधातील पाच उपाय सुचविले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत गंभीर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली, दररोज लागतोय ४६ हजार लिटर ऑक्सिजन
- CBIने गुन्हा दाखल केल्यानंतर जयश्री पाटील आक्रमक, देशमुखांना अटक करण्याची केली मागणी
- गरजेनुसारच नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश द्या – सीईओ अजित कुंभार
- महाविकास आघाडीने उच्च न्यायालयाचा निकाल सोईने वाचला- दरेकर
- वडिलांच्या निधनानंतर भाग्यश्री लिमयेने केलं मन मोकळं; शेअर केली भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

