टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने प्रचाराला सुरवातही केली आहे. भाजप शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी या चार पक्षांमध्ये मुख्य लढत असणार आहे. तर वंचित आघाडी, मनसे यांची भूमिका निर्णयक ठरणार आहे. तर आता भीम आर्मीने देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. जमल तर महाघाडी सोबत जाऊ, नाहीतर स्वतंत्र लढून भीम आर्मीची ताकद दाखवून देऊ अशी माहिती भीम आर्मीचे नेते दत्ता पोळ यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले की, संविधान विरोधी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्ष, राजकीय संघटनानी एकत्र यावे. महाआघाडी झाल्यास भीम आर्मीला पुण्यातील कॅंटोन्मेंटसह परभणी, अमरावती आणि नवी मुंबई येथून पाच जागा मिळाव्यात. महाआघाडी झाली नाही, तर राज्यातील अनेक मतदारसंघात आमची ताकद चांगली असून, तेथे उमेदवार उभे केले जाणार आहे. निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर तयारी करण्यात येणार आहे.
दरम्यान यंदा राज्यात निवडणुकीत चुरूस पाहिला मिळणार आहे. कारण एका बाजूला भाजप सेना युती असणार आहे. तर सऱ्या बाजूला विरोधकांची कॉंग्रेस आघाडी असणार आहे. तसेच अनेक छोट्या पक्षांची लढत देखील निर्णयक ठरणार आहे. या छोट्या पक्षांची लढत मोठ्या पक्षांना डोकेदुखी ठरणार असल्याचं दिसत आहे. तर वंचित आघाडी आणि मनसे यांची भूमिका ही विधानसभा निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचं म्हंटल जात आहे.
- ‘तटकरे भाजपच्या संपर्कात, भाजप आमदाराचा खळबळजनक दावा’
- साध्वी सारख्यांना इतिहास आणि विज्ञान पुन्हा शिकवण्याची गरज : अनिस
- ‘स्वराज आणि जेटली तर गेले आता पुढचा नंबर मोदींचा’
- ‘आमदार असो किंवा नसो तरीही राज ठाकरे हे खणखणीत नाणं’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

