Share

विरोधी पक्षांचे १७ आमदार भाजप प्रवेशासाठी रांगा लावून उभे, दानवेंची धक्कादायक माहिती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना धडकी भरेल असा दावा केला आहे. राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या भाजप प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी विश्वसनीय दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी दानवेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार टोलेबाजी केली.

दानवे म्हणाले की, अजित पवार यांच्याजवळ आता कोणताच झेंडा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत. आम्ही खूप दिवसांपासून त्यांना भगव्याबद्दल सांगत होतो. पण ऐकत नव्हते. आता लोकांनीच भगवा कसा असतो ते दाखवून दिलं आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या भाजप प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा दानावेंनी केला आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर अनेक नेते भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकी आधीचं विरोधकांना मोठे धक्के बसले आहेत. तर दुसरीकडे या पक्षांतरामुळे सत्ताधारी पक्ष दिवसेंदिवस ताकदवान होत आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!