नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटीबद्दल अनेकांनाकडून चिंता व्यक्त केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच आता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबात स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे गरजेचे आहे.’ असे ते म्हणाले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबाबत आणि लसीकरणावर ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी ब्लॅक फंगस या आजाराबाबत चिंता व्यक केली. हर्षवर्धन म्हणाले की, ब्लॅक फंगसचे जे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच राज्यांनासुद्धा आजाराची सूचना देण्यास सांगितले आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती ? प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- ‘प्रत्येकाला फक्त ‘हॉट’ अभिनेत्रीच हवी असते, म्हणून…’
- ‘मुंबई केंद्राला अडीच लाख कोटी देते किमान याचे भान ठेवून वादळग्रस्तांसाठी मदत करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
