🕒 1 min read
मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत बोचरी टीका केली आहे. जगभरात लस वाटण्याऐवजी तुम्ही पहिला भारतीयांना लस का नाही दिली ? ज्या लोकांचा कोरोनाने तडफडून मृत्यू झाला त्याची जबाबदारी मोदींची आणि केंद्र सरकारची नाही का ? असे सवाल प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे उपस्थित केले आहेत.
तब क्यों नही आपने कहा कि पहले भारतीयों को वैक्सीन मिलेगी फिर दुनिया को। कोरोना #COVID19 से जो लोग तड़पकर गुजर गए उनकी मौत के जिम्मेदार क्या आप और आपकी सरकार नही है ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 20, 2021
‘मोदीजी तुम्हाला फार उशिरा अक्कल आलीये. व्हॅक्सिन वाया घालवणे म्हणजे कोणाचा तरी जीव घेणे हे खरंय. मात्र जेव्हा सिरम आणि भारत बायोटेक व्हॅक्सिन निर्माण करत होते तेव्हा तुम्ही बुकिंग का नाही केली ? २१ जानेवारी पर्यंत का थांबलात ? जेव्हा देशात निर्मित झालेली व्हॅक्सिन तुम्ही जगभरात वाटत होता, तेव्हा हे शहाणपण कुठे गेले होते ? तेव्हा पहिला भारतीयांना लस मिळेल मग जगाला असं का नाही म्हणालात ? कोविड-१९ मुळे जे लोक तडफडून मृत्यू पावले त्यांची जबाबदारी तुमची आणि सरकारची नाही का ?’ असं रोखठोक भाष्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राचं हवामान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नव्हतं; म्हणून ते आले नाहीत : चंद्रकांत पाटील
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- ‘प्रत्येकाला फक्त ‘हॉट’ अभिनेत्रीच हवी असते, म्हणून…’
- ‘मुंबई केंद्राला अडीच लाख कोटी देते किमान याचे भान ठेवून वादळग्रस्तांसाठी मदत करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
