लातूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली होती. अजूनही लसीकरण सुरु आहे मात्र अनेक ठिकाणी आता लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक नागरिकांना डोस मिळत नाहीये, तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसऱ्या डोस साठी वात बघावी लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसेच मृत्यू दर देखील वाढत आहे त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे मात्र लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कासार बालकुंदा प्राथमिक केंद्रा अंतर्गत उस्तुरी येथील आरोग्य वर्धिनी केंद्रावर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्या ३६६ नागरिकांना दुसऱ्या लसीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. ३६६ लसीची मागणी असताना केवळ ७० लस देण्यात आल्याने २९६ नागरिकांना कोव्हॅक्सिनची दुसरी लस कधी मिळणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलेच थैमान घातले असल्यामुळे कोरोनाची लागण आपल्याला होऊ नये म्हणून लसीकार्णाला चांगला प्रतिसाद नागरिक देताना दिसत आहेत.
कासार बालकुंदा केंद्रावर उस्तुरी, वाक्सा, चांदोरी व चांदोरीवाडी या चार गावचा आरोग्य सेवेचा भार आहे. उस्तुरी ग्रामपंचायतीच्या विनंतीवरुन येथील केंद्रावर २ एप्रिलपासुन लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्याच लसीकरणात २०० नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली तर ९ एप्रिल रोजीच्या लसीकरणात १६६ नागरिकांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. मात्र आता ३६६ लसींची मागणी असताना केवळ ७० लस उपलब्ध असल्याने येथील नागरिकांना दुसऱ्या डोसची वात पहावी लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोदीजी, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती ? प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका
- ‘दीड वर्षात राज्य सरकारने बारा बलुतेदारांना, लोक कलावंताना काहीही मदत केली नाही’
- धक्कादायक! बीडमध्ये कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या
- ‘मुंबई केंद्राला अडीच लाख कोटी देते किमान याचे भान ठेवून वादळग्रस्तांसाठी मदत करा’
- महाराष्ट्राचं हवामान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नव्हतं; म्हणून ते आले नाहीत : चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
