Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभ होईल अशी माहिती कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदा सर्वच महाविद्यालय  ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम पार पाडत आहेत.

येवले म्हणाले यंदा राज्यातील सर्व विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ अनिल सहस्त्रबुद्धे हे दीक्षांत सभारंभाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठ नाट्यगृहात सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा दरम्यान समारंभ होईल.

यावेळी पीएचडी मंचावर संशोधकांच्या पीएचडीचे वितरण प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पद्धतीने नावांचे वाचन होईल. समारंभात ४२७ संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात एकूण ८१ हजार ७३६ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!