मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. कोरोनाच कारण देत सरकारने केवळ ५ व ६ जुलै रोजी केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. आता अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी राज्यातील प्रश्न मांडून रणनीती आखण्यासाठी आज भाजपची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण रद्द होत असल्याची टीका भाजपने केली आहे. भाजप २६ जून रोजी चक्का जाम आंदोलन करणार आहे.
दरम्यान, समारोपाच्या भाषणात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठलं तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात… हो आमचं राज्य असंत… चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही,’ अशी गर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
‘इच्छा असावी लागते, या ठिकाणी इच्छाच नाहीये. ज्यावेळी हायकोर्टात विषय मांडायला हवा होता त्यावेळी हायकोर्टात तारखा घेत होता आणि मंत्री रस्त्यावर मोर्चा काढत होते. आजही पहा इम्पेरिकल डेटा तयार करत नाहीयेत तर त्याऐवजी यांचेच कार्यक्रम, मोर्चे सुरू आहेत,’ असं देखील फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- वॉटर ग्रीड योजनेस पैठण तालुक्यातून होणार सुरुवात, आ. संदीपान भुमरेंच्या प्रयत्नांना यश!
- चलो बुलावा आया है…! : दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना
- ‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी
- ‘भाजपनेच दोन मंत्र्यांना घरी पाठवलंय, त्याचाच धसका या ठाकरे सरकारने घेतलाय’
- ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे’; फडणवीसांचा हल्लाबोल


