मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीची आज ४४ वी वार्षिक बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये रिलायन्स काय घोषणा करणार याकडं संबंध देशासह जागतिक बाजारपेठेचं देखील लक्ष लागलं होतं. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी विविध क्षेत्रांबाबत मोठ्या घोषणा केल्या असून सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरले आहेत ते ५ जी नेटवर्क आणि गुगलच्या सोबत मिळून जिओचा सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन लवकरच बाजारात दाखल होणार आहे.
गुगल आणि जिओ टीमने ‘जिओ फोन नेक्स्ट’ हा नवा फोन विकसित केला आहे. याबाबत माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले, ‘गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला आहे. हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. हा स्मार्टफोन भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा स्मार्टफोन असेल,’ असा दावा देखील त्यांनी केला आहे. १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून हा फोन बाजारात उपलब्ध होईल. सध्या या फोनची नेमकी किंमत मात्र गुपितच ठेवण्यात आली आहे.
या जिओ फोन नेक्स्ट स्मार्टफोनबाबत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई म्हणाले, ‘आमचं पुढचं पाऊल गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणाऱ्या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होत आहे. हा फोन भारतासाठी तयार करण्यात आला असून त्या लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी आहे, जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील. गूगल क्लाऊड आणि जिओ दरम्यान नवीन ५ जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटला जोडण्याला मदत करेल. सोबत भारताला डिजिटल करण्याची ही पायाभरणी असेल.’
महत्वाच्या बातम्या
- वॉटर ग्रीड योजनेस पैठण तालुक्यातून होणार सुरुवात, आ. संदीपान भुमरेंच्या प्रयत्नांना यश!
- चलो बुलावा आया है…! : दौरा अर्धवट सोडून नाना पटोले तातडीने दिल्लीला रवाना
- ‘त्या’ लेटरबॉम्ब प्ररकणात अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा; भाजपची मागणी
- ‘भाजपनेच दोन मंत्र्यांना घरी पाठवलंय, त्याचाच धसका या ठाकरे सरकारने घेतलाय’
- ‘अरे तुमच्यात हिंमत नसेल तर सांगा, मी चार महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

