Share

डब्ल्युटीसी फायनल! पराभवानंतरी न्युझीलंडसह बीसीसीआयही झाली मालामाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. ७ गडी बाद करणाऱ्या न्युझीलंडचा गोलंदाज कायली जेमीसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

मागील दोन वर्षापासुन सुरु असलेल्या या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या जेतेपदावर न्युझीलंडने विजेतेपद पटकावले. विजेतेपद पटकावल्यामुळे न्युझीलंड संघाला ११.७२ कोटी रुपयांचे बक्षिस मिळाले. तर उपविजेत्या भारतीय संघाला ५.८५ कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. तर या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ३.३ कोटी रुपये मिळतील. चौथ्या क्रमांकावरील इंग्लंड संघाला २.५ कोटी रुपये मिळतील.

पाचव्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानला १.५ कोटी रुपये मिळतील. व इतर चार संघाना प्रत्येकी ७३-७३ लाख रुपये देण्यात येणार आहे. टेस्ट क्रिकेटचा रोमांच वाढवण्यासाठी आयसीसीने २०१९ मध्ये ही स्पर्धा सुरु केली होती. या स्पर्धेत प्रत्येक संघाला मायदेशात ३ आणि परदेशात ३ अशा कसोटी मालिका खेळणे गरजेचे होते. एकुण ९ संघानी या स्पर्धेत सहभाग नोदंवला होता. मात्र या स्पर्धेत सामन्याची संख्या निश्चीत केलेली नव्हती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!