नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्च इंजिन असलेले गुगलने भारतीयांची माफी मागितली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो, त्याचा अपमान केलेला कोणालाही सहन होत नाही. मग त्याचा जोरदार निषेधही केला जातो. असाच एक प्रकार गुगलकडून घडला आहे. एका भाषेला गलिच्छ बोलणं गुगलला चांगलच महागात पडलं आहे. त्यासाठी आता गुगलला जाहीर माफी मागावी लागली आहे.
गुगलवर सगळ्यात गलिच्छ भाषा असे शोधले असता कन्नड भाषा असे उत्तर येते. यावरुन गुगलवर चहूबाजूने टिका होत आहे. कन्नड भाषिक आक्रमक झाले असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या संदर्भात गुगलला फटकारले आहे. याप्रकरणी कर्नाटकचे कन्नड, संस्कृती व वनमंत्री अरविंद लिंबावली म्हणाले की, आपल्या सर्च इंजिनवर अश्याप्रकारे उत्तर दिल्याने गुगलला कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. त्याचबरोबर त्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त करत गुगलला माफी मागायला सांगितली होती. कन्नड भाषेला अश्याप्रकारे गलिच्छ दाखवून कन्नड भाषिकांच्या अभिमानाला गुगलने धक्का पोहोचवला आहे.
यानंतर भारतीयांकडून गुगलचा कडवा विरोध झाला. आता गुगलला आपली चूक लक्षात आली आणि त्याचीच माफी मागण्यात आली आहे. सर्च इंजिन कंपनीने दावा केला, की हे कंपनीचे विचार नसून एक तांत्रिक बिघाड होता. भारतात होणाऱ्या विरोधानंतर अखेर गुगल इंडियाचे प्रवक्त्याने स्पष्टीकरण दिले. गुगलच्या सर्च इंजिनमध्ये सापडणाऱ्या अनेक गोष्टी सत्यच असतात असे नाही. अनेकदा इंटरनेटवर विचारलेल्या प्रश्नांची धक्कादायक उत्तरे येतात. हे चुकीचे असल्याचे आम्ही मान्य करतो. तरीही अशा गोष्टींची तक्रार मिळताच ती चूक दुरुस्त केली जाते.
सोबतच, गुगलच्या एल्गोरिदममध्ये आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. गुगलचे विशिष्ट असे काहीच विचार नाहीत. तरीही गैरसमजुतीने लोकांची मने दुखावली आहेत. त्याबद्दल आम्ही माफी मागतो. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि बंगळुरूचे भाजप खासदार पीसी मोहन यांच्यासह अनेकांनी गुगलच्या या चुकीवर तीव्र आक्षेप नोंदवला.
याप्रकरणी गुगलने स्पष्टीकरण देत गुगलवर एखादी गोष्ट सर्च करता त्यावेळी ती अचूक असेलच असे नाही. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट केली असता त्याचे भलतेच उत्तर येते. मात्र एखादी चूक आमच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. अर्थात याबाबत गुगलचे वैयक्तिक मत नसते. तरीही आमच्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी आम्ही दिलगीरी व्यक्त करतो.
महत्वाच्या बातम्या
- एका महिन्याच्या आत धोनीच्या घरी आणखी एका नवीन पाहुण्याचे आगमन ; पहा फोटो
- मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून आ.मेटे आणि बीड प्रशासन आमनेसामने
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
- ‘..ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू’, संभाजीराजेंचा इशारा
- ‘आरक्षणावर अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प असणे हे आश्चर्यकारक’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

