Share

Rape case in Beed । धक्कादायक घटना; हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

Published On: 

बीड : सध्या समाजात अनेक महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी पडत आहेत. महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. लैंगिक अत्याचारासंदर्भात नोंद होणाऱ्या गुन्ह्यांची संख्याही अधिक आहे. काही दिवसांपासून राजकीय नेते आणि बुवा, महाराज यांच्याविरोधातही लैंगिक गुन्ह्याची नोंद होत आहे. यातच आज बीडमध्ये अशीच एक घटना उघड झाली आहे. बीडमधील हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराजांनी लग्नाचं आमिष दाखवून लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे.

या महाराजांचं पूर्ण नाव बुवासाहेब जिजाबा खाडे असं आहे. महाराजांनी पीडित महिलेला लग्नाचं आमिष दाखवून जून 2022 ते जुलै 2022 या काळात बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेचं म्हणणं आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन खाडे महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तर दुसरीकडे खाडे महाराजांनीही त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याच्या ऐवज लुटण्यात आला असल्याची तक्रार खर्डा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

खाडे महाराजांना मारहाण झाल्यानंतर त्यांना जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, अशी माहितीही समोर येत आहे. तर महाराजांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडील सोन्याची अंगठी, सोन्याची चैन आणि आणखी काही दागिने असा एकूण 13 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. त्यांच्या या तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गीते, रामा गीते, बाजीराव गीते, अरुण गीते, भिवा गोपाळघरे या पाच संशयितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता या दोन्ही गुन्ह्यांचा तपास केल्यानांतरच या प्रकरणाची उकल होईल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!