Share

मंत्रिमंडळ बैठक संपली ; लोकलबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेद घेवून मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.

तसेच मुंबईची लाईफलाईन असलेले लोकल सेवा सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंदच आहे. लसींचे दोन डोस घेतले असतील लोकल प्रवासासाठी मुभा द्यावी अशी मागणी होत होती, पण राज्य 3 लेव्हलमध्ये असल्यामुळे कोणतीही सूट दिली जाणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामन्य मुंबईकरांना सुलभ लोकल प्रवासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचे सर्टिफिकेट घेतले जात होते. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!