औरंगाबाद : शहरातील गरजू मुलांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या चार शाळा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला आहे. उस्मानपुरा, जवाहर कॉलनी, मयुरबन कॉलनी, गारखेडा येथील सीबीएसईचे शिक्षण घेण्याची तयारी असलेल्या मुलांना प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने शहरातील मुले आता स्मार्ट शिक्षण घेऊ शकतील आणि तेही मोफत. त्यामुळे गरीब घरातील मुलांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना स्मार्ट शिक्षण देण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणार्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. प्रायोगिक तत्वावर चार शाळा सीबीएसईमधून सुरू केल्या जाणार आहेत.
त्यामध्ये उस्मानपूरा, जवाहर कॉलनी, गारखेडा, मयूरबन कॉलनी या चार शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. जुलैच्या अखेरीस या चार शाळांमध्ये सीबीएसईचे वर्ग सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. जुलै अखेरीस चार शाळांमध्ये सीबीएसईचे वर्ग सुरू केले जाणार आहे. त्यासाठी मुलांना मोफत प्रवेश दिले जाणार असून ज्या मुलांना सीबीएसई मधून शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना प्रि प्रायमरीच्या प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, युकेजीमध्ये प्रवेश दिला जाईल.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिकवणाऱ्या काही शिक्षकांमधूनच पंचवीस ते तीस शिक्षकांची सीबीएससीचे वर्ग घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. पूर्वतयारीसाठी या शिक्षकांना एक महिन्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या शिक्षकांमधूनच २५ ते ३० शिक्षक सीबीएसईचे वर्ग घेण्यासाठी निवडले आहेत. हे शिक्षक सीबीएसईला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. शहरातील आर.जे. इंटरनॅशनल स्कुल व सीबीएसईच्या शिक्षण तज्ज्ञांना बोलावून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अतिवृष्टीने परभणी जिल्ह्यातील नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला
- चार अपत्यं असणारा भाजपा खासदार मांडणार ‘लोकसंख्या नियंत्रण विधेयक’
- ‘वयोवृद्ध सर्व चांगल्या भूमिका अमिताभ बच्चन यांना देतात’: शरत सक्सेना
- Thop TV अॅप चालवणाऱ्या मालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- पाकिस्तान विरुद्ध टी-२० मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, कर्णधारासह सात खेळाडूंचे पुनरागमन


