बीड : कोरोनाच्या नियमांमुळे बीड जिल्ह्यात विवाह सोहळ्यांसाठी प्रशासनाने केवळ ५० वऱ्हाडी उपस्थित राहण्याचे नियम लागू केलेत. मात्र, तरीही नियम धाब्यावर बसवून विवाह सोहळे धुमधडाक्यात साजर होत आहेत. या पार्श्वभूमीवर गेवराईच्या तहसीलदारांनी बोरीपिंपळगाव येथे अचानक भेट दिली असता लग्नाला ५० पेक्षा अधिक वऱ्हाडींची गर्दी दिसून आली.
२० पेक्षा अधिक वऱ्हाडींनी तोंडावर मास्कच लावले नसल्याचे समोर आल्याने या ठिकाणी मंगल कार्यालयाच्या मालकास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दुसरीकडे बेलगाव येथील वधूपित्याने विवाहासाठी पोलिस व ग्रामपंचायतीची पररवानगी न घेता मुलीच्या विवाहासाठी पन्नासपेक्षा जास्त वऱ्हाडी जमवल्याने त्यांना दहा हजार रुपये दंडाची शिफारस तहसीलदारांनी केली.
कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदारांनी मंगल कार्यालय चालक रमेश पवार (रा. बोरीपिंपळगाव) यांना दहा हजार रुपयांचा दंड आकारला असून हा दंड वसूल करण्याचे आदेश बोरीपिंपळगाव येथील ग्रामसेवकास दिले आहेत. तर बेलगाव येथील झालेल्या लग्न समारंभाची वधूपिता दिगंबर ढवारे यांनी किमान १५ दिवस अगोदर ग्रामपंचायत, पोलिस ठाण्याची परवानगी घेणे आवश्यक होते. परवानगी घेतली नसून ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमवून विवाह सोहळा केला असल्याने वधूपित्यास १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून तशी नोटीस त्यांना दिली.
महत्वाच्या बातम्या
- ‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
- ..अन् आव्हाड म्हणाले, ‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’
- मोदी सरकारची घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका
- ‘उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
