Share

महाराष्ट्राला धोका कायम ; राज्यात अनलॉक नाहीच !

Published On: 

मुंबई : गेल्यावर्षी पासून कोरोना महामारीने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असून कोरोना मृतांचा आकडा देखील अधिक आहे.

मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यानंतर, विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना नियमांचे न होणारे योग्य पालन आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा तिसऱ्या स्तराचे नियम लावण्यात आले आहेत.

सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण जैसे थेच परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असे देखील यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!