नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे २०२४च्या लोकसभा निवडणुकीत आव्हान उभे करायचे असेल तर विरोधी पक्षांना एकजूट होऊन एका सक्षम नेत्याकडे या आघाडीचे नेतृत्व द्यायला हवे आणि हा नेता आताच्या घडीला शरद पवार यांच्याशिवाय दुसरा कुणीही असू शकत नाही. मोदींपुढे शरद पवार हेच सक्षम पर्याय ठरू शकतात, असे मोठे विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
देशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सक्षम पर्याय ठरेल अशी आघाडी उभी राहावी, यासाठी हालचाली सुरू आहेत. यूपीएचं नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसची यात काय भूमिका असणार, हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी वाढल्या आहेत.
किशोर यांनी शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतली तर अलिकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांनाही ते भेटले. या स्थितीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील आघाडीचा चेहरा कोण असणार, हा कळीचा प्रश्न असून त्याअनुषंगाने संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
- २०२४ मध्ये भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणार; चंद्रकांत पाटलांची डरकाळी
- गोव्यात सत्ता स्थापन झाल्यास ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, जुनी बिले माफ ! ; केजरीवालांची घोषणा
- अनिल देशमुखांच्या पत्नीला ईडीचं समन्स; उद्या हजर राहण्याचा आदेश
- ‘तिन्ही पक्ष मिळून चांगली नौटंकी करत आहेत, महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

