मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेद घेवून मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
तसेच बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. तसा निर्णय घेण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्रात येणाऱ्यांकडून आरटीपीसीआर चाचणीचे सर्टिफिकेट घेतले जात होते. मात्र, आता या पुढे ज्यांनी कोरोनाच्या दोन लस घेतल्या असतील आणि ज्यांच्याकडे तसे सर्टिफिकेट असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे.
दरम्यान आज झालेल्या राज्यमंत्रिडळाच्या या बैठकीत निर्बंध शिथिल करण्यावर चर्चा झाली. निर्बंध शिथिल केले जाईल अशी शक्यता होती, पण जैसे थेच परिस्थिती ठेवण्यावरच सरकारला कल पाहण्यास मिळाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देशाच्या तुलनेत कमी आहे. गेल्या 3 आठवड्यात रुग्ण संख्या स्थिर आहे. पण 10 जिल्ह्यांमध्ये 92 टक्के रुग्ण आहे. त्यामुळे लेव्हल ३ मध्ये अनेक जिल्हे आहे. त्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असे देखील यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला धोका कायम ; राज्यात अनलॉक नाहीच !
- २०२४ मध्ये भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणार; चंद्रकांत पाटलांची डरकाळी
- गोव्यात सत्ता स्थापन झाल्यास ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, जुनी बिले माफ ! ; केजरीवालांची घोषणा
- अनिल देशमुखांच्या पत्नीला ईडीचं समन्स; उद्या हजर राहण्याचा आदेश
- ‘तिन्ही पक्ष मिळून चांगली नौटंकी करत आहेत, महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचे काम सुरू’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
