🕒 1 min read
औरंगाबाद: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना मी आवाहन करतो की, तुमच्यात हिंमत असेल तर औरंगाबाद जिल्ह्यात वाईन किराणा दुकानांमधून विक्री करून दाखवावी, एमआयएम कार्यकर्ते, शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांना मानणारे सामान्य नागरिक आणि मी स्वतः हे दुकान फोडल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) यांनीही एखाद्या वाईन विक्री दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी शहरात यावे. असेही ते यावेळी म्हणाले.
राज्यात आता किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव २८ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला आहे. त्यामुळे आता वाईन घेणे अगदी सोप्पे झाले आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. मात्र आता यावरुन मोठ्या प्रमाणावर वाद सुरु झाला आहे. भाजपकडून महाविकास आघाडीच्या या निर्णयाला विरोध करण्यात आला आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
औरंगाबाद शहरातील सुपर मार्केट, मॉल आणि किराणा दुकाने या ठिकाणी जर वाईन विक्री सुरू झाली तर मी स्वतःस्वतः ती दुकाने फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जलील यांनी दिला आहे. जर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. असेही ते म्हणाले. तसेच पैशांसाठी महाराष्ट्रातील संस्कृती जर तुम्ही बिघडत असाल तर शेतकऱ्यांना गांजा, चरस उत्पादन घेण्यासाठी देखील परवानगी द्या. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. यामुळे आमच्या आई बहिणींचे संसार मोडतील तसेच युवक व्यसनाधीन होतील. त्यामुळे या निर्णयाला कडाडून विरोध करतो असे या पत्रकार परिषदेत जलील यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
-
“अशोक गर्ग MAGPIE ग्रुपने संजय राऊत कुटुंबाला भागीदारी दिली?”, किरीट सोमय्य्यांचा सवाल
-
“अमृता फडणवीसांना वर्षा बंगला सोडावा लागल्यामुळे त्या फ्रस्टेशनमध्ये”, मनीषा कायंदेंची टीका
-
“केवळ महसुलासाठी मद्य विक्रीला प्राधान्य देणे हे जनतेचं दुर्दैव”, अण्णांनी साधला ‘मविआ’वर निशाणा
-
आ. नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक पोलिसांना शरण; राणेंवर अटकेची टांगती तलवार
-
“नथुराम गोडसेची विचारधारा…” ; तुषार गांधींची वेदनादायक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
