Share

बिहार निवडणूक : कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ ‘या नेत्याला मिळाले स्थान

Published On: 

दिल्ली- बिहार विधानसभा निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केल्या नंतर आता काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 30 जणांच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा समावेश करण्यात आला आहे.

स्टार प्रचारकांच्या या यादीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेते राहुल गांधी, मीरा कुमार, गुलाम नबी आझाद, प्रियांका गांधी, शक्तीसिंह गोहिल, मदन मोहन सिंग, अशोक गेहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंग, भुपेश बघेल, तारिक अन्वर, रणदीपसिंह सुरजेवाला, शकील अहमद, शत्रुघ्न सिन्हा, निखिल कुमार, सचिन पायलट, प्रमोद तिवारी, अखिलेश प्रसाद सिंह, मोहम्मद जावेद, राज बब्बर, किर्ती आझाद, संजय निरुपम, उदित राज, इम्रान प्रतापग्रही, प्रेमचंद शर्मा, अनिल शर्मा, अजय कपूर आणि विरेंद्रसिंह राठोड आदी नेत्यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!