Share

परिवहन मंत्र्यांच्या अनास्थेमुळे बस डेपोचे काम रखडले, मात्र कारण कोरोनाचे!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : डिसेंबर २०१८ मध्ये औरंगाबाद महापालिकेने १०० स्मार्ट बस खरेदी केल्या. यामुळे औरंगाबादकरांना गेल्या तीन वर्षांमध्ये शहरात वावरताना मोठा दिलासा मिळाला. मात्र या स्मार्ट बसेस साठी शहरात अजूनपर्यंत स्मार्ट बस डेपो तयार होऊ शकलेला नाही. शहरासाठी बस असल्याने शहरातच बस डेपो असायला हवे जेणेकरुन सर्व सोयी सुविधा वेळेत मिळू शकतील. मात्र एस.टी. महामंडळाकडून येणारे ना हरकतपत्र अजूनही मिळालेले नाही. मनपा आयुक्त, स्मार्ट सिटी व्यवस्थापक यांनी आत्तापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. बैठका झाल्या. मात्र एमएसआरटीसीच्या मंत्र्यांनाच यात स्वारस्य नसल्याने ही प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडली आहे. मात्र कारण कोरोनाचे सांगितले जात आहे.

पालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून औरंगाबाद शहरात स्मार्ट बससेवा सुरू केली खरी मात्र अद्यापही बसडेपोसाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे स्वतःची जागा नाहीये. त्यामुळे रेल्वेस्टेशन आणि मुकुंदवाडी येथील बस डेपोची जागा स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला मिळावी, अशी मागणी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे एसटी महामंडळाकडे केली होती. एसटी महामंडळाच्या बसपोर्टचे व मध्यवर्ती बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम केले जाणार आहे.

या कामाच्या दीड कोटी रुपयांच्या विकास शुल्कात सुट देण्याचा प्रस्तावही पालिकेने एसटी महामंडळाला दिला होता. एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सिटीबस डेपोसाठीच्या जागेला एनओसी देण्यास होकार दिल्याचे त्यांनी सांगितले. बसडेपोच्या जागेसाठीचे एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) लवकरच प्राप्त होईल, असेही स्पष्ट केले. मात्र या गोष्टीलाही पाच महिने उलटून गेले आहेत. एनओसी मिळून जागा ताब्यात आल्यावर मुकुंदवाडी येथील जागेवर डेपो उभारण्याचे काम सुरु होऊ शकते.

कोरोना आणि मंत्र्यांची अनास्था : कोरोनामुळे बस डेपोचे काम रखडल्याचे बोलले जात आहे. मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये यासाठी काहीही करण्यात आलेले नाही. त्यामुळे आजपर्यंत हे काम सुरु होऊ शकलेले नाही. स्मार्ट बस डेपोकरिता जागा आणि परिवहन विभागाला डेपो उभारण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात महापालिका आणि परिवहन विभागाची संयुक्त बैठक २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार होती. मात्र ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे परिवहन मंत्री, पालकमंत्री यांच्या चालढकलीमुळेच हे काम थांबले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!