Share

काल पवारांची भेट, आज खडसेंच्या घरी; सत्तांतराबाबत फडणवीसांच मोठं विधान

Published On: 

जळगाव : महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुक्ताईनगरमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरी भेट दिली.

यावेळी भाजप नेते व आमदार गिरीश महाजन देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे जळगावातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळेच कोकणाप्रमाणे फडणवीसांनी जळगावचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी पुढारी घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती.

दरम्यान, काल शरद पवारांची भेट यानंतर आज खडसेंच्या घरी जाणे यामुळे राजकीय क्षेत्रातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सत्तांतराबाबाबत सूचक विधान केलं आहे. ‘सध्या आपण कोविड मधून चाललो आहोत. आणि कोविडचा विषय असल्याने राजकीय सत्तांतर व बाकी सगळ्या गोष्टी याकडे आमचं कोणतंही लक्ष नाही, लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ देखील नाही. एकदा कोविडची लढाई संपली की मग या गोष्टींमध्ये लक्ष घालू,’ असं फडणवीस म्हणाले आहेत.

यामुळे कोरोनाची स्थिती आटोक्यात येईपर्यंत तरी महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, भाजप नेते सत्तास्थापनेचे विविध मुहूर्त देत असतानाच खुद्द फडणवीसांनी आता कोविड लढाई संपेपर्यंत हा विषय नसल्याचे सांगितल्याने कोरोना संपल्यानंतर मात्र पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!