Share

निजामाच्या वंशजांचा शासकीय जागा हडपण्याचा डाव आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी उधळून लावला!

Published On: 

औरंगाबाद : निजामाचे वंशज असल्याचे सांगून काही जणांनी हिमायतबाग येथील फळ संशोधन केंद्राची १२ एकर शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. या जागेचा अनधिकृतपणे ताबा घेऊन त्याठिकाणी पत्रे ठोकण्यात आले होते. तसेच याठिकाणी बाउन्सर देखील तैनात करण्यात आले होते. हा प्रकार समजताच मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने संयुक्त पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी अतिक्रमण हटाव पथकाने या ठिकाणी कारवाई केली. रात्री आठ वाजेपर्यंत सर्व अतिक्रमण हटवून येथील साहित्य ताब्यात घेण्यात आले होते.

परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे औरंगाबाद शहरातील हिमायतबाग येथे फळ संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राचा मालकीची शेकडो एकर जागा आहे. यापैकी आरेफ कॉलनीच्या बाजूने रस्त्यालगतच्या तब्बल बारा एकर जागेचा काही जणांनी परस्पर ताबा घेतला होता. अनधिकृतपणे पत्र्याचे शेड उभारुन सातवा निजाम मीर उस्मान अली यांचे वंशज दिलशाद शहा यांच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. तसेच सुरक्षेसाठी या ठिकाणी सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले होते. हा प्रकार समजताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

त्यानंतर मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार याठिकाणी अतिक्रमण हटाव पथकाने सायंकाळी पाच वाजता कारवाई सुरू केली. रात्री आठ वाजेपर्यंत संपूर्ण जागा मोकळी करून साहित्य जप्त करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अपर्णा थेटे, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, आर. एस. राचतवार, इमारक निरीक्षक सय्यद जमशिद, मजहर अली, आर एम सुरासे, बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पथक, मालमत्ता विभागाचे डोके यांनी या कारवाईत भाग घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!