Share

‘शिवसेनेच्या कंगना विरोधातील आंदोलनाला परवानगी, मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का?’

Published On: 

मुंबई : लोकल सेवा सुरु करण्यासाठी मनसे आक्रमक झाली असून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कायदेभंगाचा इशारा दिला आहे. तसेच, त्यांनी बेस्टमधील गर्दीचा फोटो शेअर करत कोरोना फक्त लोकल सुरु केल्यानेच होईल का? या गर्दीने काही होणार नाही का? असा सवाल प्रशासनाला केला आहे.

संदीप देशपांडे यांनी 21 सप्टेंबर म्हणजेच उद्या सोमवारी मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. मुंबईकरांचे होत असलेले हाल लक्षात घेत त्यांना रेल्वेने प्रवास करु द्यावा, अशी संदीप देशपांडे यांनी सरकारकडे आग्रही मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी सरकारला एक आठवड्याची मुदत दिली होती.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारने सध्या सर्वत्र एपेडिमिक ऍक्ट लागू केला आहे. त्यामुळे आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे रेल्वे पोलिसांनी देशपांडे यांना नोटीस पाठवून बजावले आहे. मात्र, संदीप देशपांडे उद्या रेल्वेने प्रवास करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.

“नोटीस आली तरी आंदोलन हे केलं जाणार, मुंबईत शिवसेनेचा आंदोलनाला परवानगी मिळते. मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आमचं आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आहे, गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. मनसेचे आंदोलन हे होणारच, कंगना विरोधातील आंदोलनाला शिवसेना परवानगी फक्त मनसेच्या आंदोलनाला नोटीस दिली जाते”, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!