मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
अनलॉक-४ प्रक्रियेअंतर्गत जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अनेक खाजगी कार्यालायसह दैनंदिन व्यवहार सुरु झाल्यामुळे नागरिकांना दळणवळण करावे लागत आहे. मात्र, सद्या मुंबईतील लाईफलाईन असलेली लोकल सेवा अजूनही बंद ठेवल्याने बेस्ट वरील ताण वाढत आहे. बेस्ट बसेसमध्ये तुडुंब गर्दी होत असूनही राज्य सरकार वा महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
लोकल सेवा सुरु करण्यासाठी मनसे आक्रमक झाली असून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कायदेभंगाचा इशारा दिला आहे. तसेच, त्यांनी बेस्टमधील गर्दीचा फोटो शेअर करत कोरोना फक्त लोकल सुरु केल्यानेच होईल का? या गर्दीने काही होणार नाही का? असा सवाल प्रशासनाला केला आहे.
संदीप देशपांडे यांनी 21 सप्टेंबर म्हणजेच उद्या सोमवारी मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याचा इशारा सरकारला दिला आहे. मुंबईकरांचे होत असलेले हाल लक्षात घेत त्यांना रेल्वेने प्रवास करु द्यावा, अशी संदीप देशपांडे यांनी सरकारकडे आग्रही मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी सरकारला एक आठवड्याची मुदत दिली होती.
रेल्वे पोलिसांनी बजावली नोटीस!
कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारने सध्या सर्वत्र एपेडिमिक ऍक्ट लागू केला आहे. त्यामुळे आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे रेल्वे पोलिसांनी देशपांडे यांना नोटीस पाठवून बजावले आहे. मात्र, संदीप देशपांडे उद्या रेल्वेने प्रवास करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सोशल मिडियासाठी साडेपाच कोटींचे कंत्राट काढले असून कोरोनासाठी मदत म्हणून निधी उपलब्ध नाही – किरीट सोमैया
- ‘जाग येवो अंबे, सरकारला जाग येवो’
- मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावा आणि मगच पोलीस भरती घ्या; संभाजी ब्रिगेडची मागणी
- ‘मी असं काहीही बोललेलो नाही’, अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण !
- छोट्याशा जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या पत्त्यावर जाणार तब्बल एक लाख पत्रं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

