पुणे: राज्यातील वाढत्या कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर तसेच ओमायक्रॉन (omicron) विषाणूच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यात आता बैलगाडा शर्यत देखील रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शुक्रवारी रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात आज बैलगाडा शर्यती होणार होत्या. मात्र, ऐनवेळेस या शर्यती रद्द करण्यात आल्याने शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी ठिय्या आंदोलन देखील केले. अचानक घेतलेल्या या निर्णयावरून आढळराव पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी काल सायंकाळी सहा वाजता अहवाल मागवला. तेव्हा त्यांनी शर्यतीला संमती दिली आणि रात्री उशिरा अचानक शर्यतीला स्थगिती दिली. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रशासनावर आरोप केले आहेत. आढळराव पाटील म्हणाले, ही मोठी शर्यत होईल आणि माझं नाव मोठं होईल म्हणून जिल्ह्यातील काही नेत्यांनी मी भरविलेली बैलगाडा शर्यत हणून पाडली, अशा शब्दात आढळराव पाटील यांनी आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरी कशी झाली? धक्कादायक कारण आले समोर
- वैष्णवदेवी मंदिरातील दुर्घटना अत्यंत दु:खद-नारायण राणे
- “चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब…याला अक्कल…”, नारायण राणेंचा अजित पवारांना टोला
- राष्ट्रपतींना पडली ‘समुद्रफळाची’ भुरळ; राष्ट्रपती भवनाने मागितली माहिती
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

