मुंबई: राष्ट्रपती रानाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांना ‘समुद्रफळाची’ (Barringtonia acutangula) भुरळ पडली आहे. त्यांना मुंबईत नव्याने होत असलेल्या कोस्टल रोड परिसरातील समुद्रफळाची भुरळ पडली आहे. या परिसरातून जात असताना त्यांच्या नजरेत हे झाड पडले. आता थेट राष्ट्रपती भवनाने या झाडाबद्दलची माहिती मागवली आहे.
मुंबईतील कोस्टल रोडपरिसर तसेच वरळी सी फेस परिसरात ही झाडे लावण्यात आलेली आहेत. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला रामनाथ कोविंद चार दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते.याच दौऱ्यादरम्यान ते राजभवनातून विमानतळाकडे जात होते. यावेळी मुंबई महापालिकेच्या डी आणि जी वॉर्डातून जात असताना त्यांच्या नजरेस समुद्रफळाचे झाड पडले. त्यांना याची इतकी भुरळ पडली की, मुंबई महानगरपालिकेच्या बागकाम करणाऱ्या विभागाकडे राष्ट्रपती भावनाने या झाडाबाबत माहिती मागवली आहे.
दरम्यान मुंबई पालिका क्षेत्रातील समुद्र किनाऱ्यालगत समुद्रफळाची एकूण ३६३२ झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे या मनोहारी दृष्याने राष्ट्रपतींनाही मोहून टाकले आहे. यातूनच राष्टपती रामनाथ कोविंद यांचे निसर्ग प्रेमही दिसून येते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नव्या वर्षात कोरोनाची साथ सरावी आणि जगण्यासाठी प्रत्येकालाच बळ मिळावे’
- जम्मूमध्ये वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, १२ जणांचा मृत्यू
- ‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’
- आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया- मुख्यमंत्री ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

