Share

“चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब…याला अक्कल…”, नारायण राणेंचा अजित पवारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. भाजपला ११ तर महाविकास आघाडीला ९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई आणि महाविकास आघाडीचे संतोष सावंत यांना समसमान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने निकाल काढावा लागला. त्यात भाजपचे विठ्ठल देसाई निवडूण आले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणे म्हणाले, विठ्ठल देसाई जिंकला. चिठ्ठीवर येणं म्हणजे मोठ्ठं नशीब. तुम्ही आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलं. मी आंघोळ करता करता थांबलो. म्हटलं अरे काय ते…, असं म्हणताच उपस्थितात एकच हशा पिकला.

पुढे राणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना म्हणाले, ही निवडणूक जबरदस्तीने कायद्याचा वापर करून जिंकण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस यंत्रणा वापरत होते, नितेश राणेंचं बेल अ‌ॅप्लिकेशन चार चार दिवस चालतात. माझ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात मी असं पाहिलं नाही. डीजी येऊन ठाण मांडतात. अर्थ खात्याचे मंत्री येतात, तिन्ही पक्षाचा पराभव करून जातात त्याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणेंनी अजित पवारांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!