नवी दिल्ली: जम्मू मधील माता वैष्णोदेवी मंदिर (Mata Vaishno Devi Stampede) परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही घटना घडल्याने शोक व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत १२ जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. तर २० भाविक जखमी झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे. आता या घटनेचे खरे कारण समोर आले आहे.
कटरा येथील भवन क्षेत्रामध्ये रात्री सुमारे २.४५ च्या सुमारास ही घटना घडली. गेट नंबर ३ जवळ ही दुर्घटना घडली. नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कोरोनाचे निर्बंध असतानाही मंदिर परिसरात ही चेंगराचेंगरी कशी झाली असा प्रश्न आता यामुळे निर्माण होत आहे. तसेच या भागात सुमारे ५० हजार लोक जमा झाले होते. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली. आणि त्यात याचे नियोजनही करण्यात आले नव्हते. त्यातच काही भाविकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर धक्काबुक्की झाली. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. याबाबत जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, दर्शनासाठी गेलेल्या गाझियाबादमधील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, माता वैष्णौदेवी मंदिर परिसरात काही भाविक दर्शन घेतल्यानंतर तिथेच थांबले. त्यामुळे गर्दी झाली. तसेच लोकांना बाहेर पडण्यासाठी जागा मिळत नव्हती. थोड्याशा जागेत लोक येत जात होते. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, कटरामध्ये माता वैष्णौदेवी भवनातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना १० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’
- “चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब…याला अक्कल…”, नारायण राणेंचा अजित पवारांना टोला
- राष्ट्रपतींना पडली ‘समुद्रफळाची’ भुरळ; राष्ट्रपती भवनाने मागितली माहिती
- ‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा
- ठाकरे सरकारने ‘भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र’ केले आपण ‘भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र’ करूया- किरीट सोमय्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

