मुंबई : आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीचे ८ निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेसने याआधी विरोध केलेल्या बांधकाम क्षेत्राशी निगडित प्रस्ताव देखील आज मंजूर करण्यात आला आहे. बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
यामुळं बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला मोठा फटका सहन करावा लागला होता. अनेक बांधकाम व्यावसायिक टाळेबंदीमुळे अडचणीत आले होते. दरम्यान, याआधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयत्यावेळी प्रस्ताव आल्याने काँग्रेसने विरोध केला होता. आज तीनही पक्षांनी चर्चा करून या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
हा प्रस्ताव मजूर केल्यानंतर भाजपने मात्र टीकेची झोड उठवली आहे. चिखली विधानसभेच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण महाविकास आघाडी सरकारला करून दिली आहे. ‘कोणतेही आश्वासन दिलेले नसताना बिल्डरांना प्रीमियम मध्ये 50 टक्के सवलत देणारे महाविकास आघाडी सरकार, गोरगरीब शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार देण्याचे आश्वासन कधी पूर्ण करणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोणतेही आश्वासन दिलेले नसताना बिल्डरांना प्रीमियम मध्ये 50 टक्के सवलत देणारे महाविकास आघाडी सरकार, गोरगरीब शेतकर्यांना हेक्टरी 25 हजार देण्याचे आश्वासन कधी पूर्ण करणार? @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra #maharashtra #mahavikasaghadi
— Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) January 6, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘…ही आनंदाची गोष्ट, शिवसेना आता बंगालमध्ये मोठा रेकॉर्ड करेल’
- औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यासाठी ठाकरेंचं केंद्राला पत्र
- हिटमॅन रोहित शर्माच्या आगमनाने ऑस्ट्रेलियन बॉलर्सना धडकी !
- बिल्डर्सना मोठा दिलासा, प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव कॅबिनेटने केला मंजूर
- ‘राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांमध्ये तणाव आणि संशयाचं वातावरण’


