औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी दि. २३ जून रोजी दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली या वेळ ते बोलत होते. उड्डाणपुल चिकलठाणा विमानतळाऐवजी अमरप्रित चौक येथे बांधण्यात यावे, जालना रोड येथील वक्फ मिळकत सिटीएस क्र. १२५०३ च्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील इतर विविध विकासाच्या मुद्दयांवर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
पत्रकार परिषदेत खासदार जलील म्हणाले की, औरंगाबाद शहराची गरज व जनतेच्या प्राथमिकतेला प्राधान्य देऊन चिकलठाणा विमानतळा ऐवजी अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यात यावे, अशी मागणी यापुर्वी भारतीय राष्ट्रीय महामार्गच्या अधिकारी व रस्ते वाहतुक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आलेली आहे. २०१५ मध्ये सदरील रस्त्यावर सर्व्हिस रस्ते, पदपथांसह बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये विविध ठिकाणी उड्डाणपूल, सायकल ट्रॅकचा समावेश करुन सुमारे ४०० कोटी निधी जाहीर करण्यात आले होता, परंतु सद्यस्थितीत फक्त ७० कोटी इतक्या कमी व मर्यादित निधीची मान्यता देण्यात आली असुन त्यामधुन सव्र्हिस रोड, सायकल ट्रॅक इत्यादी सुविधा वगळण्यात आलेले आहेत.
तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ अथवा इतरत्र ठिकाणी रहदारी व वाहतुक करण्यासाठी अमरप्रीत चौक या मुख्य रस्त्याचा वापर नागरीकांकडून होत असल्याने तेथे नेहमी वाहनांची वर्दळ जास्त असल्याने सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते, म्हणुन प्रत्यक्षात उड्डाणपूलाची आवश्यकता तेथे आहे. सद्यपरिस्थितीत प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. प्रस्तावित पादचारी क्रॉसिंग निरुपयोगी आहे कारण व्यावहारिकदृष्ट्या तिची उपयुक्तता शून्यइतकीच असल्याने फक्त सरकारी पैशांचा अपव्यय असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पवारांच्या दिल्लीतील खलबतांनंतर आता राऊतांनी घेतली भेट ! ट्विटवरून दिली ‘ही’ माहिती
- नातेवाईकाच्या लग्नासाठी आला अन् जलाशयात पोहण्याच्या मोहापायी बुडाला!
- मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी फडणवीस सरकारच्या प्रकल्पाबाबत मोठा निर्णय !
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
- राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९३ टक्के ! जाणून घ्या आजची रुग्णसंख्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
