Share

#Budget2021 : यंदाच्या अर्थसंकल्पात गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.

वित्त मंत्र्यांनी शुक्रवारी सादर केलेल्या सन 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणात, पुढील वित्त वर्षामध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धिदर 11 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प प्रथमच केवळ डिजिटल स्वरुपात उपलब्ध राहणार असून तो ऍपवरच पाहता येऊ शकेल.

कोरोना महामारीत उत्पादन आणि सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला. तर कृषी आणि कृषीलाला असलेल्या जोडधंद्यांचे उत्पन्न महामारीतही वाढल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागातील गरिबांसह शेतकऱ्यांना प्राधान्य राहण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने कृषी क्षेत्राच्या सुधारणांसाठी तीन नवीन कायदे लागू केले आहेत. या कायद्याला विरोध करत दिल्लीसह सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!