नवी दिल्ली:- कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
निर्मला सीतारमण आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रयत्न करणार आहेत. पण त्याआधीच सरकारला दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जानेवारीत जीएसटी कलेक्शनच्या रेकॉर्डमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. जानेवारीत जीएसटीचं एकूण कलेक्शन 1.20 लाख कोटींवर पोहोचलं आहे. रविवारी वित्त मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. टिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनात महिला आणि विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता पाहता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ऋण समाधान योजने’ला मिळाली मुदतवाढ; १६ हजार शेतकरी कर्जमुक्त
- चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश पण…
- इराण, इस्रायल आणि अरब राष्ट्र संघर्षाचे रक्तरंजित पडसाद भारतावर उमटणार नाही यासाठी खबरदारी घ्यावीच लागेल – सामना अग्रलेख
- आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रात तर, बाद फेरी अहमदाबादेत
- बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

