Share

सचिन वाझे ज्या प्रकरणात पहिल्यांदा निलंबित झाले होते ते प्रकरण नेमके आहे तरी काय ?

Published On: 

मुंबई – मुंबईत गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने (NIA) अटक केली होती. या कारवाईनंतर अखेर सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान,न्यायालयाने सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी कोडडीत रवानगी झाल्यानंतर आता मुंबई पोलीस दलाकडून अखेर सचिन वाझे यांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांच्या निलंबित होण्याची हि पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील एका प्रकरणात वाझे यांची निलंबन झाले आहे. वाझे यांचे ज्या ख्वाजा युनूस प्रकरण नेमके काय आहे ? हे आपण आज जाणून घेणार आहोत.

2 डिसेंबर 2002मध्ये घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्ब स्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता तर 39 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती.

27 वर्षीय ख्वाजा युनूस हा परभणीचा रहिवासी होता. तो व्यवसायाने इंजीनियर होता. दुबईत काम करत होता.दरम्यान, अटक करताना त्याला पोटाही लावण्यात आला होता. 6 जानेवारी 2003 मध्ये युनूसची चौकशी करण्यात आली होती.

यानंतर युनूसला चौकशीसाठी औरंगबादला नेले जात असताना नगर-पुणे महामागार्वर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये पोलिसांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, यावेळी ख्वाजा बेडीसह पळून गेला, असे पोलीस सांगतात.अद्यापि तो पोलिस दप्तरी फरार आहे. ते प्रकरणही न्यायालयात आहे.

तर दुसऱ्या बाजूला ख्वाजाचा पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.  ख्वाजाला मारून टाकण्यात आलं आहे आणि त्या घटनेपासून वाचण्यासाठीच अपघात आणि तो पळून गेल्याचा बनाव करण्यात आल्याचा त्याच्या आई-वडिलांचा आरोप होता. या प्रकरणात पुढे २००४मध्ये वाझे यांना निलंबित करण्यात आले. तेव्हापासून वाझे पोलिस दलातून बाहेर होते. नुकतेच ते क्राईम ब्रँचमध्ये दाखल झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!