अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यातील दुसरा दिवस असून ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली. अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा लाभ घेत दिवस-रात्र कसोटीत भारताला दुसऱ्या दिवशी इंग्लंडिवरुद्ध १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातली तिसरी टेस्ट मॅच दोन दिवसांच्या आत संपली.
या निकालानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या सीरिजची चौथी आणि अखेरची टेस्टही याच मैदानात खेळवली जाणार आहे, त्यामुळे या मॅचसाठीचं पिच कसं असेल, याबाबत कयास बांधले जात आहेत.अनेक माजी खेळाडूंनी खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांनी खेळपट्टीचा बचावही केलाय. तर मायकल वॉन, डेविड लॉयड, केविन पीटरसन अशी इंग्लंड दिग्गजांनी या खेळपट्टीचा मुद्दा उचलून धरला आहे.
आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी अहमदाबादच्या खेळपट्टीचा बचाव करत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यावेळचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या दोन्ही सत्रांदरम्यान देण्यात आलेल्या चहापानाच्या ब्रेकवेळी गावसकर स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह समालोचन करत होते. यावेळी त्यांना अहमबादच्या खेळपट्टीबद्दल विचारण्यात आले. खेळपट्टीची खरोखरच इतकी चर्चा व्हायला हवी का? खेळपट्टीऐवजी फलंदाज आणि फिरकीपटूंवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे होते का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
यावर संतापून उत्तर देताना गावसकर म्हणाले की, “नक्कीच, ज्याप्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी झाली त्याची चर्चा व्हायलाच पाहिजे होती. जिथे फलंदाज त्रिफळाचीत झाले. जिथे फलंदाज पायचित झाले. त्या खेळपट्टीला कोण कसे खराब म्हणू शकते. खरे तर मला कळत नाही, आपण परदेशी खेळाडूंना का एवढे महत्त्व देतो. ते जे काही म्हणतील त्याची आपण का जास्त चर्चा करावी. आपण त्यांना का म्हणत नाही की, ऐ भावा चल निघ इथून (ए भाई चल फूट यहाँ से).”
Sunny G is not mincing his words on all the talk about the pitch ???? – "#ChalPhut!"
Waiting to see what meme @WasimJaffer14 can turn this into ????#INDvENG #AmdavadTaiyarHai #IndiaTaiyarHai pic.twitter.com/Rjcum9ayrp
— Star Sports (@StarSportsIndia) March 4, 2021
यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे उदाहरण देताना गावसकर म्हणाले की, “जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांवर सर्वबाद झाला होता. तेव्हा कपिल देवने काही तरी म्हटले, गावसकरने काही तरी म्हटले, सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली किंवा विरेंद्र सेहवागने काही तरी म्हटले. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी त्याला महत्त्व दिले का. अजिबात नाही. मग आपण का इंग्लंडच्या खेळाडूंना महत्त्व द्यावे. आपण त्यांना सरळ म्हणायला हवे, चला निघा इथून. आपण त्यांना जेव्हा महत्त्व देणे कमी करू, तेव्हाच त्यांना चांगला धडा मिळेल.”
महत्त्वाच्या बातम्या
- …म्हणून मराठवाड्यात सर्वच कोविड सेंटरवर महिला सुरक्षा रक्षकांच्या नेमणूकीचा निर्णय
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार; आंदोलकांचा पवित्रा
- गॅस दरवाढीचा निषेध; महिलांनी पंतप्रधान मोदींना पाठवल्या गोवऱ्या
- कोरोनाचा धोका वाढला : औरंगाबादेत सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तिनशेपार
- कोरोनामुळे यंदा वेरूळ येथील महाशिवरात्रीची यात्रा रद्द, भाविकांनी घरूनच घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

