इंग्लंड : जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा सुरु होण्यास काही तसाच उरले आहेत. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत. भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा केली आहे.
अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे. याचमुळे इशांत शर्मा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळली. भारताचा संघ जाहीर करण्यात आल्यावर कर्णधार विराट कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनसलाठी भारतीय संघाचा नेमका गेम प्लॅन काय असेल, याबाबत कोहलीने मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी कोहली म्हणला, भारतीय संघ हा आक्रमकतेसाठी ओळखला जातो. त्यामुळे या सामन्यातही आम्ही आक्रमक खेळ करणार आहोत. आम्ही जेव्हा मैदानात उतरू तेव्हा आम्ही आक्रमकच असणार आहोत. आमच्यासाठी हा एक कसोटी सामना आहे, जो जिंकण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत, असं विराट कोहली म्हणाला.
यानंतर भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगही या सामन्याबाबत बराच उत्सुक असून त्याने संघाला शुभेच्छा देत कर्णधार विराट कोहलीला ‘भारतात येताना WTC ट्रॉफी घेऊनच ये, तुला माझ्याकडून शुभेच्छा’ असा भावनिक संदेश दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

