Share

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंग आणि संजय राऊतांची होणार भेट!

Published On: 

अयोध्या (उत्तर प्रदेश) :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह हे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. उद्या १५ जून रोजी शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्ववभूमीवर संजय राऊत अयोध्येत आज दाखल झाले आहेत. संजय राऊत आणि बृजभूषण सिंह मंगळवारी संध्याकाळी सात वाजता शरयू नदीच्या तीरावर एकमेकांना भेटणार आहेत. संजय राऊत आणि बृजभूषण सिंह यांच्या भेटीमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणे महत्वाचे आहे.

आदित्य ठाकरे हे उद्या बुधवारी १५ जूनला अयोध्या दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेनेचे प्रमुख नेते एक दिवस आधीच अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्या शरयू नदीच्या तीरावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याच्या आणि सगळ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत आज संध्याकाळी शरयू नदीच्या तीरावर जाणार आहेत. त्यावेळी खासदार बृजभूषण सिंह हे संजय राऊत यांची भेट घेतील, अशी माहिती आहे.

राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येत येणार होते. मात्र, या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती. बृजभूषण सिंह यांचा कडवा विरोध पाहून राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा पुढे ढकलला होता.

आता या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत आणि बृजभूषण सिंह यांच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसे यावर काय भूमिका घेणार आणि कशी प्रतिक्रिया व्यक्त करणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!