Share

Natural Calamity | केदारनाथ धामचे चित्तथरारक दृश्य आले समोर, मंदिराजवळील बर्फाचा डोंगर कोसळला

Published On: 

केदारनाथ : शनिवारी सकाळी केदारनाथ धाम जवळील चोरबारी ग्लेशियरवर बर्फाचा डोंगर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे यात्रेकरू आणि स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

केदारनाथ – बद्रीनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ मंदिरा जवळ हिमस्खलन झाले आहे. मात्र यात कोणतीही जीवित किंवा वित्त आणि झाली नाही. या घटनेनंतर मंदाकिनी नदीची पाण्याची पातळी देखील नॉर्मल आहे. ही घटना मंदिर परिसरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर घडली आहे.

गेल्या काही दिवसांत केदारनाथ मध्ये दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या

केदारनाथ धाम आणि केदार घाटी परिसरात सतत पाऊस सुरूच आहे. आणि त्यामुळे या परिसरात सतत दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहे. 21 सप्टेंबर रोजी केदारनाथ महामार्गावर दरड कोसळली होती. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतेही वाहन त्या ढिगाऱ्याखाली आले नाही. 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी केदारनाथ महामार्गावर पुन्हा दरड कोसळण्याची घटना समोर आली होती. घटनेत एका प्रवासी बसचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले.

सततच्या पावसामुळे आणि दरड कोसळली मुळे केदारनाथ आणि बद्रीनाथ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांना या ट्रफिकमध्ये तासनतास अडकून राहावे लागते. या सर्व घटनांमुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!