औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. गेल्या वर्षीचे शैक्षणिक सत्र बंद असल्याने विद्यार्थी वाहतूक बंद होती. त्यामुळे स्कूल बसच्या मालक-चालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. स्कूल बसवाल्यांना बस व व्हॅनचे मासिक हप्तेसुद्धा भरता येऊ शकले नाहीत. त्यातच आता कोरोनाची दुसरी लाट आणि ब्रेक दि चेनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांचाही विचार करावा, त्यांनाही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात विद्यार्थी ने-आण करण्यासाठी शेकडो बस व स्कूल व्हॅन धावत असतात. चालक व वाहक आपली उपजीविका व्हॅनच्या माध्यमातूनच भागवत असतात. गेले पूर्ण वर्ष पूर्णपणे वाहतुकीविना पार पडले. आगामी वर्षातसुद्धा शाळा उघडण्याचे संकेत दिसून येत नसल्याने वाहनधारकांनी आपली वाहने विकण्यासाठी बाजारात उभी केली आहेत. कर्ज घेतलेले मासिक हप्ते भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्याने स्कूल बस-व्हॅनचे मालक-चालक हतबल झाले आहेत.
या सर्व वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. लोकप्रतिनिधींनी या ज्वलंत प्रश्नाला हात घालून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची गरज आहे. तशी मागणीदेखील स्कूल व्हॅन मालकांची आहे. नाईलाजास्तव काही चालक-मालकांनी स्कूल व्हॅनमध्ये इतर व्यवसाय सुरू केले आहेत. पण त्यातूनही उत्पन्न होत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळेच स्कूल बस-व्हॅनचे चालक-मालक शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘विकास दर टिकवण्यासाठी उद्योग आणि सरकारमध्ये पूर्ण विश्वास हवा’
- घटना दुर्देवी! यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्यावी-रामदास आठवले
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

