Share

अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहेत ; दोघांनीही राजीनामा द्यावा

Published On: 

मुंबई : राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खंडित झाला होता. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं.

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व उर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल याबाबत मोठा खुलासा केला. मुंबईतील बत्ती गुल होण्यामागे चीनचा हात असल्याची माहिती त्यांनी दिली. चीनने सायबर हल्ला करून मुंबईत ब्लॅकआऊट घडवून आणला हा घातपाताच आहे. असे काल त्यांनी पत्रकार परिषेद घेऊन सांगितले होते.

या सर्व प्रकरणावर भाजपने आता जोरदार हल्ला केलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विद्यमान गृहमंत्री व उर्जामंत्र्यांना चांगलेच धारेवर धरलेले आहे. ‘या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला. कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

एका आंतरराष्ट्रीय पेपरच्या आधारावर आयपीएस ऑफिसरने अहवाल तयार केला. चीनचे नाव अहवालात होते तर केंद्रीय परराष्ट्र किंवा गृहमंत्रालयाला कळविले होते का, असा सवाल उपस्थित करत अधिवेशनाच्या तोंडावर अपयश लपविण्याचे कारस्थान, असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्यक्षात मुंबईला येणाऱ्या ४०० केव्हीच्या दोन लाईन ब्रेकडाऊन झाल्या होत्या, इतर दोन लाईनवर लोड आले, म्हणून स्पार्किंग झाले, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

संबंधित लाईन सायबर अटॅकच्या पातळीचा नाही. हा घातपात नाही, अधिकाऱ्यांनी चूक केली, समन्वय ठेवला नाही. अपयश झाकण्यासाठी दोन्ही मंत्री जनतेला मूर्ख बनवत आहे, असे अशोभनीय कृत्य करणाऱ्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!