मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी आयकर विभागाला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला मातोश्रीला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. ट्विटमध्ये म्हंटले आहे की,‘योगायोग किती मोठा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्याचे नाव देखील ‘मातोश्री’ आहे.’ तसेच दोन्ही हातात घड्याळी असतात, याचं गुपित ५० लाख तर नाहीत?, असा खोचक सवालही करण्यात आला आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले आहेत की,‘यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ ला दोन कोटी रोकड आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची डायरीत नोंद सापडली आहे. जाधव म्हणतात, ‘मातोश्री’ म्हणजे माझी आई.’ असू शकते हो, पण कमवलेल्या ३०० कोटी पैकी आणखी किती ‘मातोश्री’ला दिले हेही सांगा, बाकी आम्ही समजून घेऊ.’
महत्वाच्या बातम्या
- यशवंत जाधव यांनी ‘मातोश्री’ला दिली दोन कोटींची भेट? आयटीच्या छाप्यात सापडली डायरी
- “यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे”, भातखळकरांचे टीकास्त्र
- धन्य तो श्रावणबाळ! ‘त्या’ कारवाईवरून केशव उपाध्येंचा टोला
- “पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे खेळ खल्लास”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
- पुण्यात तुमची चॉईस काय असेल?; गडकरींनी मिश्कीलपणे म्हटले…


