मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav), त्यांचे सहकारी आणि बीएमसी कंत्राटदार यांच्या निवासस्थानी २५ फेब्रुवारी रोजी ईडीला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले होते. तपासात जाधव यांनी केलेल्या कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरी सापडली असून अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डायरीतील एका नोंदीमध्ये मातोश्रीला ५० लाख रुपयांचे घड्याळ तसेच गुढीपाडव्याला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे.यावरूनच भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी यशवंत जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.
यशवंत जाधव यांनी गुढी पाडव्यास ‘मातोश्री’ला 2कोटी रुपये प्रदान केल्याची नोंद आयटी खात्यास जाधवांच्या डायरीत सापडली आहे. पण मातोश्री म्हणजे आपली आई असून ते 2कोटी रुपये दानधर्म करण्यासाठी आईला दिल्याचा खुलासा जाधवांनी केल्याचे या बातमीत म्हटले आहे. धन्य तो श्रावणबाळ! असा टोला केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत लगावला आहे.
यशवंत जाधव यांनी गुढी पाडव्यास ‘मातोश्री’ला 2कोटी रुपये प्रदान केल्याची नोंद आयटी खात्यास जाधवांच्या डायरीत सापडली आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) March 27, 2022
पण मातोश्री म्हणजे आपली आई असून ते 2कोटी रुपये दानधर्म करण्यासाठी आईला दिल्याचा खुलासा जाधवांनी केल्याचे या बातमीत म्हटले आहे. धन्य तो श्रावणबाळ pic.twitter.com/nCW3Og9eoE
दरम्यान, यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या ३० कोटी रुपयांच्या विविध कंत्राटांसाठी बिमल अग्रवाल यांची मर्जी राखल्याचा संशय आहे. जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळ्याच्या आमदार असून त्यांनी २०१९ मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. कोलकाता येथील प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीकडून झालेल्या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विभागाला या शपथपत्रातून मिळाली होती. जाधव आणि कुटुंबीयांनी भायखळा येथील इमारत खरेदीसाठी सुमारे १५ कोटी रुपये कंपनीने दिले होते. जाधव कुटुंबीयांनी नंतर हे पैसे कंपनीला परत केले, जे नंतर कंपनीने न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केले.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: आज मुंबईशी भिडणार दिल्ली कॅपिटल्स; विराटचा ‘तो’ विक्रम रोहित मोडणार का?
केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी सुरु- अमोल मिटकरी
पुण्यात तुमची चॉईस काय असेल?; गडकरींनी मिश्कीलपणे म्हटले…
“पेन ड्राईव्ह अस्त्रामुळे खेळ खल्लास”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला जोरदार टोला
“भक्ती, अंधभक्ती किंवा चमचेगिरी म्हणजे काय?”, संजय राऊतांनी सांगितली कथा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

